AmravaticitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra Politicspolitics

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा पहिला कल हाती! किरण सरनाईक आघाडीवर

महायुतीच्या किरण सरनाईक यांची सुरुवात आघाडीने; अदिती पोहरे आणि श्रीकांत देशपांडे यांच्यातही चुरस

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक मतमोजणीतील प्राथमिक कल हाती येण्यास सुरुवात झाली असून, या प्राथमिक कलानुसार शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे, महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक आणि बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीत चुरस दिसून येत असून, सुरुवातीच्या कलांमुळे निवडणुकीतील उत्सुकता वाढली आहे.

मात्र, हे केवळ प्राथमिक कल असून, अंतिम निकालासाठी संपूर्ण मतमोजणी पूर्ण होणे आवश्यक आहे. पुढील फेऱ्यांमध्ये मतांचे चित्र बदलते का आणि अखेर विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button