AmravaticitynewsLatest NewsMaharashtraMaharashtra Politicspolitics
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक आघाडीवर; काँग्रेसच्या आदिती पोहरे पिछाडीवर!

पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत सरनाईक यांची आघाडी कायम; निकालाकडे सर्वांचे लक्ष
अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या पसंतीच्या फेरीत महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर असल्याचे प्राथमिक कलातून समोर येत आहे. दुसरीकडे, काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
मतमोजणीदरम्यान किरण सरनाईक यांची आघाडी कायम असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, सध्या समोर आलेले हे प्राथमिक कल असून, अंतिम निकालासाठी मतमोजणी पूर्ण होणे आवश्यक आहे.
आगामी फेऱ्यांमध्ये मतांचे अंतर किती राहते आणि अंतिम निकाल काय लागतो, याकडे उमेदवारांसह समर्थकांचे लक्ष लागले आहे.



