AmravatiAmravati GramincitynewsCrime NewsDhamangaonLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

जीवघेण्या हल्ल्यानंतर फरार आरोपीचा रेल्वेने पसार होण्याचा डाव फसला! धामणगाव स्थानकावर पोलिसांची कारवाई

धामणगाव रेल्वे : यवतमाळमध्ये जीवघेणा हल्ला केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला धामणगाव रेल्वे स्थानकावरून पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर-पुणे एक्सप्रेसने पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला दत्तापूर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. रात्रीच्या सुमारास प्लॅटफॉर्मवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला.

देऊरवाडी येथील श्याम विष्णू बुटाले यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील फरार आरोपी अन्वर उर्फ अब्बु शेख खलील हा धामणगाव रेल्वे स्थानकावर असल्याची गुप्त माहिती दत्तापूर पोलिसांना मिळाली.

आरोपी नागपूर-पुणे एक्सप्रेसने पसार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रात्री सव्वानऊच्या सुमारास धामणगाव रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सापळा रचला.

काही वेळातच ट्रेन प्लॅटफॉर्मवर दाखल झाली. आरोपी पसार होण्यापूर्वीच पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे आरोपीचा रेल्वेने पळून जाण्याचा प्रयत्न फसला.

ही कारवाई मनोज धोटे, अविनाश राठोड, राजू गुप्ता आणि राहुल मेश्राम यांच्या पथकाने केली. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला अवधूतवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

जीवघेण्या हल्ल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीचा रेल्वेने पसार होण्याचा प्रयत्न दत्तापूर पोलिसांनी हाणून पाडला. गुप्त माहितीच्या आधारे धामणगाव रेल्वे स्थानकावर सापळा रचून करण्यात आलेली ही कारवाई पोलिसांसाठी महत्त्वाची ठरली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास अवधूतवाडी पोलीस करत आहेत.

सिटी इंडिया न्यूजसाठी धामणगाव रेल्वे येथून संतोष वाघमारे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button