AmravaticitynewsFestival NewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत ७७ वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा कायम! राजापेठ भगतसिंग मंडळात विदर्भाचा विघ्नहर्ता विराजमान

राजकमल चौकात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे भव्य स्वागत; यंदा जगन्नाथ पुरी मंदिराचा आकर्षक देखावा ठरणार विशेष आकर्षण

अमरावती | City News

अमरावतीच्या गणेशोत्सवाला यंदा भक्ती, परंपरा आणि भव्यतेची अनोखी किनार लाभली आहे. तब्बल ७७ वर्षांची परंपरा असलेल्या राजापेठ भगतसिंग गणेशोत्सव मंडळात विदर्भाचा विघ्नहर्ता विराजमान झाला असून, राजकमल चौकात बाप्पांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

राजापेठ भगतसिंग गणेशोत्सव मंडळाचा ७७ वर्षांचा अखंड गणेशोत्सवाचा वारसा आजही मोठ्या उत्साहाने जपला जात आहे. ३ सप्टेंबर रोजी अनुप अग्रवाल मित्र मंडळाच्या माध्यमातून राजकमल चौकात विदर्भाच्या विघ्नहर्त्याचे भव्य स्वागत करण्यात आले.

ढोल-ताशांचा गजर, भक्तिमय वातावरण आणि आकर्षक सजावटीमुळे राजकमल चौक परिसर गणेशभक्तांनी गजबजून गेला होता. यावेळी उज्जैनच्या महाकालेश्वर नगरीची झलक दाखवणारे आकर्षक देखावेही साकारण्यात आले होते. अमरावतीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत गणरायाचे दर्शन घेत बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले.

जगन्नाथ पुरी मंदिराचा भव्य देखावा

यंदाच्या गणेशोत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे राजापेठ भगतसिंग गणेशोत्सव मंडळाकडून साकारण्यात आलेला ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी मंदिरावर आधारित भव्य देखावा.

या देखाव्याची नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली असून, १५ सप्टेंबर रोजी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार राकेश ओला यांच्या हस्ते या देखाव्याचा शुभारंभ होणार असल्याची माहिती अनुप अग्रवाल यांनी City News सोबत बोलताना दिली.

७७ वर्षांची परंपरा, गणरायावरील अढळ श्रद्धा आणि भव्य देखाव्यांची आकर्षक मेजवानी यामुळे यंदाचा राजापेठ भगतसिंग गणेशोत्सव अमरावतीकरांसाठी विशेष ठरणार आहे.

परंपरेचा वारसा जपत आधुनिक आकर्षणांची जोड देणाऱ्या या गणेशोत्सवामुळे राजापेठ परिसरात गणेशभक्तीचा उत्साह आणखी वाढला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button