AmravatiAmravati GramincitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

सोनारा भिलटेक येथील घरफोडीचा गुन्हा उघड; ४ आरोपी अटकेत!

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; चोरीच्या सोन्याचा ८.९४० ग्रॅमचा गोळा आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त, १ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

अमरावती ग्रामीण : चोरी, घरफोडी, जबरी चोरी आणि दरोड्यांच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या गुन्हे शोध पथकाने समांतर तपास करत सोनारा भिलटेक येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या सोन्याचा गोळा आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनारा भिलटेक येथे ४ मार्च २०२६ ते ६ मार्च २०२६ दरम्यान फिर्यादी आशिष संजय कावरे यांच्या घरात चोरी झाली होती. तीन अज्ञात इसमांनी घराच्या मागील भिंतीकडून घरात प्रवेश करून कपाटातील चांदीचे दागिने चोरून नेल्याचे तपासात समोर आले होते. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात अप.क्र. ७७/२०२६, कलम ३०५(अ), ३३१(४) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक माहिती, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि उपलब्ध गुन्हेगारांच्या हालचालींचा आढावा घेत तपासाची दिशा निश्चित केली. या तपासातून आरोपी निष्पन्न करण्यात आले.

त्यानुसार १७ मार्च २०२६ रोजी चेतन नरेंद्र चव्हाण, वय २५ वर्षे, याला ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांच्या संगनमताने सदर चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर गुन्ह्यातील इतर आरोपींनाही चांदूर रेल्वे येथून ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान चोरी केलेले सोने आरोपी रोहित रवि इमले याने एका सोनाराकडे गहाण ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. मात्र, विना पावतीचे सोने स्वीकारण्यास सोनाराने नकार दिल्यानंतर चोरीच्या सोन्याचा गोळा तयार करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी तपासादरम्यान ८.९४० ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोळा, अंदाजे १ लाख २८ हजार रुपये किंमतीचा, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली अंदाजे ७० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल जप्त केली. अशा प्रकारे एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

या प्रकरणात चेतन नरेंद्र चव्हाण, वय २५ वर्षे, रा. सोनारा भिलटेक, ह.मु. मोशी, ता. खेड, जि. पुणे; प्रतीक राजेंद्र वाघाडे, वय २३ वर्षे, रा. चांदूर रेल्वे; रोहन नंदू शेख, वय २४ वर्षे, रा. सांगवी प्रमापूर, ता. चांदूर रेल्वे आणि रोहित रवि इमले, वय २५ वर्षे, रा. चांदूर रेल्वे यांना अटक करण्यात आली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण निकेतन कदम आणि अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेडार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लोंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

कारवाईमध्ये PSI रोहित कुळकुडे, ASI मनोज चव्हाण, पोलीस अंमलदार गजेंद्र ठाकरे, सुरेश वाघाडे, सचिन गारगाटे, दिनेश कोंगाणेया, चेतन दुबे, सायबर विभागाचे विकास अँगीकर आणि जितेश गोस्वामी तसेच चालक पवनकर राजरत्न यांनी सहभाग घेतला.

चांदूर रेल्वे परिसरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत चार आरोपींना अटक आणि चोरीच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button