citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

वाठोडा पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी आणि वाहनचोरीचे 4 गुन्हे उघड

पेट्रोलिंगदरम्यान संशयित तिघांना ताब्यात घेतले; 4 मोटारसायकलींसह चांदीचे दागिने असा 2 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे. पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली. चौकशीत आरोपींनी वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि वाहनचोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या कारवाईत पोलिसांनी एकूण 4 गुन्हे उघडकीस आणले असून, चोरी गेलेल्या चांदीच्या दागिन्यांसह तब्बल 4 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे 2 लाख 10 हजार रुपये आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलिंगदरम्यान मोहम्मद दानिश अली मोहम्मद अर्शद अली, वय 20 वर्षे, रा. गल्ली नंबर 4, कदरिया मदरसा जवळ, हसनबाग, नंदनवन; सय्यद सलमान सय्यद जलाल, वय 20 वर्षे, रा. गरीब नवाज नगर, बौद्ध विहार जवळ, यशोधरा नगर; तसेच मोहम्मद अर्शद उर्फ नाबालिक साजिद शेख, वय 20 वर्षे, रा. गरीब नवाज चौक, वाठोडा, नागपूर यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले.

तिघांची सखोल चौकशी केली असता वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अप. क्र. 416/26, कलम 331(4), 305(अ), 3(5) BNS अंतर्गत दाखल घरफोडीच्या गुन्ह्यासह अप. क्र. 418/26, 420/26 आणि 422/26, कलम 303(2) BNS अंतर्गत दाखल वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

कारवाईदरम्यान घरफोडीच्या गुन्ह्यात चोरी गेलेले सर्व चांदीचे दागिने तसेच आरोपींनी चोरी केलेल्या एकूण चार मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

या कारवाईमुळे वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास पुढे जाण्यास मदत झाली असून, आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याचा तपास पोलीस करत आहेत.

वाठोडा पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या या कारवाईमुळे चोरीच्या घटनांना आळा घालण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास हातभार लागणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button