citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

कलमना पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी चोरीचा छडा, दोन आरोपी अटकेत

गुन्हेप्रकटीकरण पथकाची कामगिरी; चोरीचा १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन संशयित आरोपींचा शोध सुरू

नागपूर : कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडी चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हेप्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ४ डिसेंबर २०२६ ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत फिर्यादी राहुल भिमजीयानी, रा. गुजराती कॉलनी, कलमना, हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून चोरी केली. या चोरीत एकूण १ लाख २९ हजार ८१९ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली.

या प्रकरणी कलमना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९१८/२०२५, कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

तांत्रिक तपासातून आरोपी निष्पन्न

गुन्ह्याचा तांत्रिक तपास करताना पोलिसांनी संशयित आरोपींची माहिती मिळवली. त्यानुसार मुबारक वकीलबाबू शहा (वय २१) आणि निकेश बलराम शहा (वय २७) यांना आरोपी म्हणून निष्पन्न करण्यात आले.

पोलिसांनी मुबारक शहा याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीचा मुद्देमाल त्याच्याकडे असल्याचे समोर आले. त्यानंतर चोरीचा मुद्देमाल विकत घेणारा आरोपी सलमान खान याच्या माध्यमातून मुद्देमाल खरेदी करणाऱ्या फैजान यालाही ताब्यात घेण्यात आले.

फैजान याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे जाऊन १० ग्रॅम शुद्ध सोन्यासह अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दोन आरोपी अटकेत; दोघे फरार

या प्रकरणात पोलिसांनी मुबारक वकीलबाबू शहा (वय २१, रा. कुंदनलाल गुप्ता नगर, बंडू किराणा दुकानाजवळ, यशोधरा) आणि फैजान खान बलद अजिम खान (वय २७, रा. राजीव गांधी नगर, अशफाक किराणा दुकानाजवळ, यशोधरा) यांना अटक केली आहे.

तर निकेश बलराम पाढु (वय २५, रा. कुंदनलाल गुप्ता नगर, यशोधरा) आणि सलमान खान इकबाल खान (वय ३०, रा. कुंदनलाल गुप्ता नगर, नुरी मस्जिद मागे, यशोधरा) हे पाहिजे आरोपी असून त्यांचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रविण काळे, पीओएनआय करीम पठाण, पीएसआय गजानन राऊत, पोहेकॉ प्रमोद कांगले, विशाल भैसारे, पो.अं. नितीन मिश्रा, ललित शेंडे, अविनाश गवळवंशी तसेच कलमना पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी केली.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, दक्षिण विभागाचे पोलीस अधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कलमना पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button