AmravatiamravaticitynewsLatest NewsMaharashtra

फोर व्हीलर देण्याच्या आमिषाने ६.१० लाखांची फसवणूक?; मेळघाटातील आदिवासी बांधवाने न्यायाची मागणी

दोन वर्षे उलटूनही ना गाडी, ना पैसे परत; ग्राहक कल्याण परिषदेचे पोलीस अधीक्षकांकडे निवेदन

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यात फोर व्हीलर गाडी देण्याचे आमिष दाखवून एका आदिवासी बांधवाची तब्बल ६ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, धारणी तालुक्यातील काकरमल येथील दीपक गणू जांभेकर यांना २०२४ मध्ये फोर व्हीलर गाडी देण्याचे आश्वासन देत हमीद शेख आणि शकील यांनी ६ लाख १० हजार रुपयांची रक्कम घेतल्याचा आरोप आहे.

मात्र, या व्यवहाराला दोन वर्षे उलटूनही संबंधित व्यक्तीला ना गाडी मिळाली, ना भरलेली रक्कम परत मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित आदिवासी बांधवाला आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच, संबंधित आरोपींशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी आणि संबंधित पक्षांची भूमिका समोर येणे अद्याप बाकी असून, तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button