citynewsLatest NewsMaharashtraNagpur

NEET पेपर लीक प्रकरणावर नागपुरात आंदोलन; अभिजीत दिपके आज करणार शक्तिप्रदर्शन

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी; संविधान चौकात दुपारी ४ वाजता आंदोलन

नागपूर : प्रतिनिधी

NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिपके हे आज सकाळी नागपुरात दाखल झाले आहेत. या प्रकरणातील जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी नागपुरातील संविधान चौकात दुपारी ४ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांची दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत ते NEET पेपर लीक प्रकरण, पुनर्परीक्षेची प्रक्रिया तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

NEET-UG 2026 परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या आरोपांमुळे देशभरातील विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात होणाऱ्या आंदोलनाकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचे आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात निषेध नोंदविण्यात येणार असून पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागण्याही करण्यात येणार आहेत. संविधान चौक परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button