Latest NewsMaharashtraMaharashtra PoliticspoliticsYavatmal

यवतमाळ विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

यवतमाळ, प्रतिनिधी : यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महायुतीच्या राजकीय हालचालींना वेग आला असून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. शिवसेनेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून दुष्यंत चतुर्वेदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी पालकमंत्री संजय राठोड स्वतः उपस्थित राहून उमेदवारी प्रक्रियेत सहभागी झाले. महायुतीच्या वतीने ही जागा शिवसेनेला देण्यात आल्यानंतर दुष्यंत चतुर्वेदी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राठोड यांनी महायुतीच्या एकजुटीचा पुनरुच्चार करत निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

तर उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी पक्ष नेतृत्वाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत विकासकामे आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडली.

यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महायुतीने अधिकृत उमेदवार मैदानात उतरवल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे. आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button