citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारला भीषण आग; सर्व प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील जवळा परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर धावत्या कारला अचानक भीषण आग लागल्याने काही काळ एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेनंतर काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी गेली. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सुदैवाने, कारमधील सर्व प्रवासी सतर्कतेने आणि वेळेत वाहनाबाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेत प्रशासनाला कळवले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली.

या आगीत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू असून आग नेमकी कशामुळे लागली याचा सविस्तर शोध घेतला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button