citynewsIndia NewsLatest News

दिल्लीत उभी असलेल्या बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार; चालक आणि वाहक अटकेत

देशाची राजधानी दिल्ली हादरवणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. राणी बाग परिसरात उभी असलेल्या स्लीपर बसमध्ये एका महिलेवर कथित सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बसचा चालक आणि वाहक (कंडक्टर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पितमपुरा येथील झोपडपट्टी परिसरात राहते आणि मंगोलपुरी येथील एका कारखान्यात काम करते. सोमवारी रात्री ही घटना घडल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, दोन व्यक्तींनी उभी असलेल्या स्लीपर बसमध्ये तिच्यावर अत्याचार केला. तक्रार दाखल होताच दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बस जप्त केली आणि चालक व कंडक्टरला ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून घटनास्थळावरील पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

या घटनेमुळे राजधानीतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि वाहतुकीदरम्यान महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी समाजाच्या विविध स्तरांतून केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button