अमरावतीत भीतीचं सावट! तिवसा हायवेवर ट्रकची बिबट्याला धडक — शहराच्या उंबरठ्यावर वन्यजीवांचा धोका

अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव ट्रकने बिबट्याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना वैभव वानखडे यांच्या शेताजवळ मध्यरात्रीच्या सुमारास घडली. वेगाने जाणाऱ्या अज्ञात ट्रकने बिबट्याला जोरदार धडक दिली. धडकेनंतर बिबट्या रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेला आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ वनविभागाला कळवले. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी चौधरी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमी बिबट्याला मदत करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे तिवसा आणि आसपासच्या भागात बिबट्याचा वावर वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
⚠️ प्रशासनाचा इशारा:
👉 रात्री बाहेर पडताना सावधगिरी बाळगा
👉 एकटे फिरणं टाळा
👉 लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवा
वनविभागाकडून सध्या परिसरात गस्त वाढवण्यात आली असून बिबट्याचा शोध सुरू आहे.
ही घटना केवळ अपघात नसून, जंगल आणि शहर यांच्यात वाढणाऱ्या संघर्षाचा इशारा मानला जात आहे. अन्न आणि पाण्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याने अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
📺 अमरावतीकरांनो सावध राहा… अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत राहा — सिटी न्यूज



