AmravaticitynewsLatest NewsLocal NewsMaharashtra

अमरावतीत संतापजनक प्रकार! शाळेसमोर नाल्यात सापडला धोकादायक मेडिकल कचरा — मुलांच्या आरोग्यावर गंभीर संकट

अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक ७, खापर्डे बगीचा परिसरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. आदर्श प्राथमिक शाळेसमोरच्या नाल्यातून सलाईनच्या नळ्या, इंजेक्शन आणि रक्ताने माखलेला वैद्यकीय कचरा आढळून आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलग दुसऱ्या दिवशी नाली साफसफाईदरम्यान कामगारांना हा धोकादायक मेडिकल वेस्ट सापडला. विशेष म्हणजे, हा प्रकार शाळेसमोर घडल्याने लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ अधिकाऱ्यांना कळवले. एस. आय. जवंजाळ यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि पुरावे म्हणून छायाचित्रेही घेतली. मात्र, तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

❗ नागरिकांचे सवाल:

👉 हा मेडिकल कचरा टाकतोय कोण?
👉 कोणत्या हॉस्पिटल किंवा क्लिनिकची ही बेफिकिरी?
👉 प्रशासन अजूनही ठोस कारवाई का करत नाही?

दरम्यान, स्वास्थ्य निरीक्षक जाधव यांना संपर्क साधूनही ते स्वतः घटनास्थळी आले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या प्रतिनिधींनी भेट दिली असली तरी नागरिकांमध्ये नाराजी कायम आहे.

या प्रकरणाचे व्हिडिओ आणि फोटो पुरावे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही माहिती देण्यात आली आहे. तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

ही घटना केवळ निष्काळजीपणाची नसून, नागरिकांच्या—विशेषतः शाळकरी मुलांच्या—आरोग्याशी थेट खेळ असल्याचे मानले जात आहे. महापौरांच्या प्रभागातच असा प्रकार घडत असताना प्रशासनाची उदासीनता अधिकच प्रश्न निर्माण करत आहे.

📺 अमरावतीकरांनो सावध रहा… अशा गंभीर मुद्द्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पाहत राहा — सिटी न्यूज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button