citynewsLatest NewsMaharashtra

मराठी चित्रपट ‘गाव बोलावतो’चा सातासमुद्रापार जलवा! USA मध्ये ‘Best Writer’ पुरस्काराने सन्मान

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. ‘गाव बोलावतो’ या मराठी चित्रपटाने सातासमुद्रापार आपल्या कलेचा ठसा उमटवत अमेरिकेत मोठा सन्मान पटकावला आहे.

USA मध्ये पार पडलेल्या Marathi International Film Festival 2026 मध्ये या चित्रपटाचे लेखक सचिन विठ्ठल पाटील यांना Best Writer पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शक विनोद माणिकराव असून, प्रशांत नारोडे आणि गणेश इंगोले हे निर्माते आहेत. विशेष म्हणजे, दिग्दर्शक आणि निर्माते हे विदर्भातील, विशेषतः अमरावतीशी संबंधित असल्याने या यशामुळे संपूर्ण विदर्भात आनंदाचे वातावरण आहे.

हा भव्य सोहळा ३ एप्रिल २०२६ रोजी न्यू जर्सी (अमेरिका) येथे पार पडला. मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा सन्मान, मराठी कलाविश्वासाठी निश्चितच अभिमानास्पद ठरत आहे.

📺 अशाच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद बातम्यांसाठी पाहत राहा — सिटी न्यूज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button