सोन्याच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा, खरेदीसाठी योग्य वेळ!

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून सोनं-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत होते. मात्र आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून ग्राहकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे.
गुड रिटर्न्सच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल १,८०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे १ तोळा सोन्याचा दर आता १,४९,१३० रुपयांवर आला आहे. तर १० तोळ्यांसाठी तब्बल १८,००० रुपयांची घट नोंदवली गेली असून सध्या हा दर १४,९१,३०० रुपये आहे.
२२ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. १ तोळा सोनं १,६५० रुपयांनी स्वस्त होऊन १,३६,७०० रुपयांवर पोहोचले आहे. १० तोळ्यांसाठी १६,५०० रुपयांची घट झाली असून दर १३,६७,००० रुपये झाला आहे.
याचबरोबर १८ कॅरेट सोन्याच्या दरातही १,३५० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे १ तोळा सोनं १,११,८५० रुपयांवर आले असून १० तोळ्यांसाठी १३,५०० रुपयांची घट नोंदवली गेली आहे.
दरम्यान, चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही.
👉 प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (प्रति ग्रॅम)
👉 २४ कॅरेट
मुंबई – १४,९१३ ₹
पुणे – १४,९१३ ₹
चेन्नई – १५,०६६ ₹
दिल्ली – १४,९२८ ₹
कोलकाता – १४,९१३ ₹
बंगळुरू – १४,९१३ ₹
अहमदाबाद – १४,९१८ ₹
👉 २२ कॅरेट
मुंबई – १३,६७० ₹
पुणे – १३,६७० ₹
चेन्नई – १३,८१० ₹
दिल्ली – १३,६८५ ₹
कोलकाता – १३,६७० ₹
बंगळुरू – १३,६७० ₹
अहमदाबाद – १३,६७५ ₹
👉 १८ कॅरेट
मुंबई – ११,१८५ ₹
पुणे – ११,१८५ ₹
चेन्नई – ११,५२० ₹
दिल्ली – ११,२०० ₹
कोलकाता – ११,१८५ ₹
बंगळुरू – ११,१८५ ₹
अहमदाबाद – ११,१९० ₹
सोन्याच्या दरात झालेली ही घसरण सण-समारंभाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते. तज्ञांच्या मते, जागतिक घडामोडींमुळे पुढील काही दिवस दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी दरांची खात्री करूनच निर्णय घेणे गरजेचे आहे.



