citynewsLatest NewsMaharashtraNagpur

शौचालयात आढळला विषारी नाग; सर्पमित्राच्या धाडसी कामगिरीने टळला अनर्थ

नागपूर जिल्ह्यातील कोराडी नाका परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका घरातील शौचालयात विषारी नाग आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील सदस्याने शौचालयाचा दरवाजा उघडताच आत वेटोळे घालून बसलेला मोठा नाग दिसला. अचानक समोर आलेल्या सापामुळे कुटुंबीय घाबरून तातडीने बाहेर पळाले.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्र आकाश शेळके घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत शांतपणे आणि कौशल्याने परिस्थिती हाताळली. सुरुवातीला काठीच्या सहाय्याने सापाला शौचालयातून बाहेर काढण्यात आले. मात्र, बाहेर येताच साप आक्रमक झाला आणि फणा काढून उभा राहिला.

तरीही सर्पमित्राने धाडस दाखवत सापाला नियंत्रणात घेतले आणि अखेर त्याला सुरक्षितपणे प्लास्टिकच्या डब्यात पकडण्यात यश मिळवले.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, पकडलेल्या नागाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button