citynewsLatest NewsMaharashtraWashimYavatmal

वाशिममध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार: वडिलांनी रंगेहात पकडला आरोपी, तातडीने अटक

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. खानापूर गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली असून, यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी तरुणाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २८ मार्चच्या मध्यरात्री ही घटना घडली. शेजारील गावातील एक १९ वर्षीय तरुण रात्रीच्या सुमारास संबंधित मुलीला भेटण्यासाठी तिच्या घरी आला होता. रात्री सुमारे ११ वाजता मुलीचे वडील आणि भाऊ झोपेतून जागे झाले असता मुलगी खोलीत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

संशय आल्याने त्यांनी घराच्या परिसरात शोध घेतला असता, घराच्या अंगणातच मुलगी आणि तो तरुण आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. वडिलांनी आरडाओरडा करताच आरोपीने तेथून पळ काढला. यानंतर घाबरलेल्या मुलीने वडिलांना रडत रडत घडलेला प्रकार सांगितला. “तो भेटण्यासाठी आला होता, मात्र त्याने माझ्या इच्छेविरुद्ध जबरदस्ती केली,” असा खुलासा पीडितेने केल्याची माहिती आहे.

या प्रकरणात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशा घटनांमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button