Uncategorized

अमरावतीत ‘HPV’ लसीकरण मोहिमेचा उत्साहात शुभारंभ; शहरी आरोग्य केंद्र विलास नगर येथे विशेष सत्र

अमरावती, दि. २३ मार्च २०२६ – अमरावती महानगरपालिकाने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला (Cervical Cancer) प्रतिबंध घालण्यासाठी शहरातील १३ शहरी आरोग्य केंद्रांमध्ये HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. आज या मोहिमेचा एक भाग म्हणून शहरी आरोग्य केंद्र विलास नगर येथे विशेष लसीकरण सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर श्रीचंद तेजवाणी, नगरसेवक श्री संजय नरवणे, तसेच समाजसेवक कौशिक अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. उद्घाटन प्रसंगी महापौरांनी पालकांना संबोधित करत सांगितले, “मुलींचे आरोग्य हेच खऱ्या अर्थाने घराचे आरोग्य असते. भविष्यातील गंभीर आजारांपासून आपल्या लेकींना सुरक्षित ठेवण्यासाठी ‘HPV’ लस प्रभावी सुरक्षा कवच आहे. पालकांनी जागरूक राहून आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे.”

वैद्यकीय मार्गदर्शन:
महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डा. विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी आरोग्य केंद्र विलास नगर येथे डा. मनिष ठाकरेडा. संतोष तोटे यांनी पालकांना लसीचे तांत्रिक महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी प्रतिपादन केले, “कर्करोगमुक्त भविष्यासाठी ही लस मुलींना देणे काळाची गरज आहे.”

कार्यक्रमात आरोग्य सेविका, एल टी., औषधी निर्माण अधिकारी, डी ई ओ, आशा स्वयंसेविका आणि अन्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी आपल्या मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

महानगरपालिकेच्या १३ शहरी आरोग्य केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध असून, १४ वर्ष पूर्ण आणि १५ वर्ष पूर्ण न केलेल्या मुलींना लस देण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालकांना करण्यात आले आहे. यामुळे शहरातील मुलींना निरोगी आयुष्याची ग्वाही मिळणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button