Crime NewsLatest NewsNagpur

नागपूरमध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न! चाकू आणि पाईपने हल्ला

नागपूरच्या अंबाझरी परिसरात जुन्या वादातून हिंसक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. २२ मार्च रोजी सुदाम नगरी भागात फिर्यादी सचिन मानेराव हे मित्रासोबत दुचाकीवरून जात होते, याच दरम्यान आरोपींनी त्यांना अडवत थेट हल्ला चढवला, मुख्य आरोपी गजानन बत्तलवार याने चाकूने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने प्रसंगावधान राखत वार चुकवला, मात्र चाकू गळ्याला घासून गेला. यानंतर इतर आरोपींनीही चाकू, लोखंडी पाईप आणि हातांनी फिर्यादीवर बेदम मारहाण केली.

या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई अंबाझरी पोलिसांनी तत्काळ करत गुन्हा दाखल केला आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे… सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button