Crime NewsIndia NewsJalgaonLatest NewsMaharashtra

“दारू पाजतो, घरी ये…” म्हणत पार्टीला बोलावलं; जळगावात तरुणावर चॉपरने हल्ला, धक्कादायक कारण समोर


जळगाव शहरातील जैनाबाद परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नितीन नाना काळे असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी श्याम तुकाराम सूर्यवंशी याला ताब्यात घेतले आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, नितीन काळे आणि श्याम सूर्यवंशी हे दोघेही पूर्वी चांगले मित्र होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता.घटनेच्या दिवशी आरोपीने “दारू पाजतो, घरी ये” असे सांगत नितीनला पार्टीसाठी बोलावले. दोघे एकत्र बसून मद्यपान करत असताना, जुन्या वादातून आरोपीने अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात नितीनचा मृत्यू झाल. श्याम आणि नितीन यांच्यात याआधीही वाद झाला होता. एका घटनेत श्यामने काचेची बाटली फोडून नितीनवर हल्ला केला होता. या प्रकरणाची केस न्यायालयात सुरू होती. त्यासाठीच नितीन गोव्याहून जळगावात आला होता.मृताच्या कुटुंबीयांच्या आरोपानुसार, श्याम हा केस मागे घेण्यासाठी नितीनवर दबाव टाकत होता. मात्र नितीनने केस मागे घेण्यास नकार दिल्याने हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली असून, मित्रत्वातून निर्माण झालेल्या वादाचे भीषण रूप समोर आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button