पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ बुध्दीबळ (महिला) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 06.02.2026) – महात्मा ज्योतिराव फुले विद्यापीठ, जयपूर येथे 23 ते 27 फेब्राुवारी, 2026 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ बुध्दीबळ (महिला) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये इन्स्टिट¬ुट ऑफ फार्मसी अॅन्ड रिसर्च, बडनेराची कु. तन्वी कानतुटे, एस.एस.जी.एम. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, शेगांवची कु. साक्षी भोजने व कु. समृध्दी देशमुख, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीची कु. अंजली पवार, प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेराची कु. भार्गवी कुलकर्णी व कु. अयुती पेंढारी, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीची कु. दिव्या ग्रेसपुंजे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीची कु. कृष्णा भुयार व कु. सनिका मोरे हिचा समावेश आहे. निवड झालेल्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथे 11 ते 20 फेब्राुवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



