कमलनयन बजाज स्मृति राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यापीठाचे सुयश

कु. श्रावणी रोटे हिचा कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते सत्कार
अमरावती (दि. 05.02.2026) – वर्धा येथे नुकत्याच झालेल्या 50 व्या कमलनयन बजाज स्मृति राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत विद्यापीठाची कु. श्रावणी श्रीकांत रोटे हिने चतुर्थ क्रमांक पटकावून विद्यापीठाचा नावलौकीक केला. याबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते कु. श्रावणी हिचा सत्कार करण्यात आला. 22 व 23 जानेवारी, 2026 या कालावधीत ‘क्यों गांधी आज भी जीवित है?’ या विषयावर शिक्षा मंडळ वर्धा तर्फे 50 वा कमलनयन बजाज स्मृती राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शिक्षा मंडळ, जमनालाल बजाज मार्ग, सिव्हिल लाईन, वर्धा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातून 84 विद्यापीठांनी आपला सहभाग नोंदविला.
सदर वक्तृत्व स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याकरीता विद्यार्थी विकास विभागातर्फे सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅन्ड टेक्नॉलॉजी, बडनेरा रोड, अमरावती येथील कु. श्रावणी श्रीकांत रोटे या विद्यार्थीनीची निवड करण्यात आली होती. कु. श्रावणी हिने सदर स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकावून रोख रक्कम रु. पाच हजार व स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र प्राप्त करुन विद्यापीठाचा नावलौकीक केला आहे. याबद्दल कु. श्रावणीचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक, डॉ. राजीव बोरकर यांनी अभिनंदन केले आहे.



