गो. से. महाविद्यालय, खामगावच्या १० विद्यार्थ्यांची इंटिग्रेटेड इंटरशिप साठी निवड

खामगाव:- गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे प्रथमच किरण अकॅडमी पुणे मार्फत इंटिग्रेटेड इंट्रनशिप आणि प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रामध्ये नामांकित असलेल्या आणि इंटिग्रेटेड इंट्रनशिप आणि प्लेसमेंट ड्राईव्ह क्षेत्रात कार्यरत असलेली किरण अकॅडमी, पुणे व टिचिंग आणि प्लेसमेंट सेल तसेच संगणकशास्त्र विभाग यांचे मार्फत विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ड्रायव्हरच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, किरण अकॅडमी पुणेच्या मॅनेजर कांचन जंगम, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. ए. ए. तायडे आणि प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. एच. एस. चांडक व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. ए. ए. तायडे यांनी केले तर प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या आणि किरण अकॅडमी च्या मॅनेजर कांचन जंगम यांनी प्रथम सत्रामध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट सेल काय असते, एंट्रन्सशिप कशी असते, आपल्याकडे कोण कोणते कौशल्य असायला हवे आदी विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले, तसेच द्वितीय सत्रामध्ये विद्यार्थ्यांची लेखी चाचणी परीक्षा घेण्यात आली. आणि तृतीय सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अशा पद्धतीने तीन सत्रांमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या ड्राइव्ह मध्ये १४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी १०२ विद्यार्थी ड्राईव्हसाठी उपस्थित झाले. आणि त्यामधून १० विद्यार्थ्यांची इंटिग्रेटेड इंट्रनशिप आणि प्लेसमेंट ड्राईव्ह साठी निवड झाली. या विद्यार्थ्यांना सहा महिन्यासाठी किरण अकॅडमी पुणे येथे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच उर्वरित निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण फी मध्ये 60% सूट देण्यात आलेली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत व अभिनंदन विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव चे अध्यक्ष डॉ. सुभाषजी बोबडे, सचिव डॉ. प्रशांतजी बोबडे, प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर आणि प्लेसमेंट सेल समन्वयक डॉ. एच. एस. चांडक, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ.ए.ए.तायडे यांनी केले.
यापूर्वीही महाविद्यालयाने अशा अनेक कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन केले होते त्यामध्येही अनेक विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच पुढील काळातही अशाच नामांकित कंपन्यांचे कॅम्पस ड्राइव्ह आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देत, खामगाव व परिसरातील विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्लेसमेंट सेल समन्वयक डॉ. चांडक यांनी केले. प्रा. मनोज बाभळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कॅम्पस ड्राइव्हच्या यशस्वी आयोजनासाठी प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. एच. एस. चांडक, डॉ.जयेश एस. तातेड, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख डॉ. ए.ए.तायडे,डॉ.ए.ए. पटोकार, प्रा.एन.पी.तांबट, प्रा. मनोज बाभळे आदींनी परिश्रम घेतले. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागिब देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.



