विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

अमरावती – (दि. 23.01.2026) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुह्मदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, उपकुलसचिव डॉ. दादाराव चव्हाण, सहा. कुलसचिव श्री अनिल मेश्राम, सहा. कुलसचिव श्री मिलींद देशपांडे तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. संचालन तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.



