AmravatiLatest NewsSocial News

गो. से. महाविद्यालयाच्या वतीने दोन दिवसीय विद्यार्थी उत्पादन प्रदर्शनी व विक्री यशस्वी

प्रदर्शनीला खामगावकरांचा उदंड प्रतिसाद, सौ. श्रद्धाताई बोबडे यांनी मानले खामगावकरांचे आभार

खामगाव :- स्व. नरेंद्रजी उपाख्य बाबासाहेब बोबडे (माजी नगराध्यक्ष, नगरपरिषद खामगाव तसेच माजी अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) यांच्या स्मृतिदिनानिमित्त गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव यांच्या वतीने टिळक स्मारक, खामगाव येथे शनिवार दि. १७ जानेवारी ते रविवार दि. १८ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित दोन दिवसीय विद्यार्थी उत्पादन प्रदर्शनी व विक्री (Exhibition cum Sale) हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या संपन्न झाला. या उपक्रमाचे उद्घाटन शनिवार, सकाळी ११ वाजता टिळक स्मारक येथे मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटन सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर हे होते. उद्घाटक म्हणून मा. डॉ. प्रशांतजी बोबडे (सचिव, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) तसेच सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे (सदस्य, शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्व. बाबासाहेब बोबडे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. सर्व मान्यवरांचे स्वागत वृक्षारोपणाद्वारे करण्यात आले. या प्रदर्शनीमध्ये महाविद्यालयातील एकूण ५४ टेबलवर विविध उत्पादनांची विक्री व प्रदर्शनी लावण्यात आली होती. या उपक्रमात १०० पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. दोन दिवसांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची उत्पादने व खाद्यपदार्थांची यशस्वी विक्री केली. प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव घेताना उत्पादन निर्मिती, सादरीकरण, आर्थिक नियोजन, व्यवहार कौशल्य व व्यवस्थापन यांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. हा अनुभव भविष्यात निश्चितच उपयुक्त ठरेल, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त करत आयोजक व महाविद्यालयाचे मनापासून आभार मानले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या नाविन्यपूर्ण, उपयुक्त व आकर्षक उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. हस्तकला व सजावटीच्या वस्तू, दैनंदिन वापरातील उत्पादने तसेच घरगुती व चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स नागरिकांचे विशेष आकर्षण ठरले. सर्व स्टॉल्स विद्यार्थ्यांनीच उभारले असून उत्पादन निर्मितीपासून ते विक्री, आर्थिक नियोजन व व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. एखाद्या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना इतका मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची ही खामगाव शहरातील पहिलीच घटना असून, ही संधी सौ. श्रद्धाताई बोबडे यांच्या संकल्पनेतून साकारली. मान्यवरांनी विविध स्टॉल्सना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. खामगाव शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय वाटचालीस निश्चितच दिशा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या दोन दिवसीय प्रदर्शनीला विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. सुभाषजी बोबडे, उपाध्यक्ष मा. प्रकाशजी तांबट, सचिव मा. डॉ. प्रशांतजी बोबडे, कोषाध्यक्ष मा. अजिंक्यदादा बोबडे, निसर्ग ग्रुप खामगावच्या अध्यक्षा सौ. निताताई बोबडे तसेच मंडळाचे मा. सदस्य यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रदर्शनीच्या आयोजिका सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्यांना स्वावलंबी बनवणे व त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करणे हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आणत दोन दिवसीय प्रदर्शनी यशस्वीरीत्या पार पडली, याबद्दल मी सर्व खामगावकरांचे मनापासून आभार मानते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळालेली प्रेरणा व चालना त्यांच्या पुढील आयुष्यात नक्कीच उपयोगी ठरेल,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच कौशल्याधिष्ठित शिक्षणाची जोड देण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने हा एक यशस्वी व स्तुत्य प्रयत्न करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तो पूर्ण क्षमतेने यशस्वी करून दाखविला, याबद्दल सर्व विद्यार्थी व आयोजकांचे अभिनंदन,” असे मत त्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या समन्वयक डॉ. रेश्मा मारवाडी, प्रा. संगीता वायचाळ, प्रा. कोमल काळे, प्रा. पुनम तिवारी, प्रा. डॉ. डी. एन. व्यास (वाणिज्य विभाग प्रमुख), प्रा. डॉ. महेश गायकवाड, प्रा. सुरज ठेंग, प्रा. डॉ. जे. डी. पोरे, प्रा. डॉ. डी. टी. अढाऊ, प्रा. सुहास पिढेकर, प्रा. आर. एम. चव्हाण, प्रा. अक्षय सिडाम, प्रा. डॉ. व्ही. एस. आठवार, प्रा. जयश्री हेडा, प्रा. रुचिका कारंजकर, डॉ. अर्चना पाटील, प्रा. वैष्णवी साहू, प्रा. पायल भन्साली, प्रा. आशा पेशवानी, प्रा. पूजा बेंद्रे, प्रा. कोमल चोपडे, प्रा. राज फाटे, प्रा. ज्योती शर्मा, प्रा. वृषाली घोराळे, डॉ. रोहिणी धरमकार, श्री. अभय मोहिते यांनी अथक परिश्रम घेतले. प्रदर्शनीस मिळालेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी खामगावकरांचे मनःपूर्वक आभार मानले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button