Amaravti GraminLatest NewsSocial News

अकोला शाखा (WIRC) आयसीएआय तर्फे गो. से. महाविद्यालय, खामगाव येथे लेखा संग्रहालयाचे उद्घाटन

खामगाव :- विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी The Institute of Chartered Accountants of India (ICAI), अकोला शाखा (WIRC) यांच्या वतीने लेखा संग्रहालय (Accounting Museum) उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य व वनस्पति शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक पडघन यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुभाषजी शंकरराव बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ), श्री प्रकाशजी तांबट (उपाध्यक्ष) आणि डॉ. प्रशांतजी बोबडे (सचिव) उपस्थित होते. WIRC चे अध्यक्ष सीए केतन साईया यांच्या शुभहस्ते लेखा संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सीए केतन साईया यांनी विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउंटंट (CA) या क्षेत्रातील विविध करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच CA अभ्यासक्रमातील विविध टप्पे, अभ्यासादरम्यान उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्ती व संधी यांची सविस्तर माहिती दिली. CA हा प्रतिष्ठित व व्यापक संधी देणारा व्यावसायिक अभ्यासक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी WIRC चे अध्यक्ष सीए केतन साईया, उपाध्यक्ष सीए पियुष चांडक, सचिव सीए जीनल सावला, कोषाध्यक्ष सीए (डॉ.) फेनिल शाह, RCM सीए सौरभ अजमेरा ,तसेच अकोला शाखेचे अध्यक्ष, सीए धीरज चांडक, उपाध्यक्ष सीए रोमिल सोजातीय, सचिव, सीए श्याम माहेश्वरी, कोषाध्यक्ष व प्रकल्प संचालक सीए विशालकुमार राजपाल, WICASA अध्यक्ष व प्रकल्प संचालक सीए प्रतीक मंत्री, सीए धीरज चांडक, सीए उमेश अग्रवाल, सीए जयेश बजाज, सीए रतन राठी, सीए नवलकिशोर शर्मा, सीए गुलराज आयलानी,सीए अलका अग्रवाल, सीए मीना देशमुख, सीए हेमंत राठी, सीए आयुष पुरवार, सीए भंसाली, सीए प्रमोद अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर सीए उपस्थित होते. अध्यक्षीय भाषण डॉ. अशोक पडघन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेश्मा मारवाडी यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. महेश गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. लेखा संग्रहालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लेखा व्यवसायाचा इतिहास, त्यातील कालानुरूप बदल तसेच आधुनिक घडामोडी यांची माहिती मिळणार असून हे संग्रहालय शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button