Latest NewsMaharashtraNagpur

“ऑपरेशन थंडर” अंतर्गत नागपूरमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती; विद्यार्थ्यांनी घेतली ‘Say No To Drugs’ शपथ

नागपूर, दि. — :
नागपूर शहरात तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पोलीस विभागाकडून सातत्याने जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी बेलतरोडी पोलीस ठाणे हद्दीतील नारायणा स्कूल, वर्धा रोड येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष “ऑपरेशन थंडर” अंतर्गत व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पोलीस ठाणे बेलतरोडी, नागपूर शहर यांच्या वतीने नारायणा स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला. मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या “ऑपरेशन थंडर” या विशेष मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनविरोधी जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान शाळेच्या परिसरात आकर्षक अँटी-ड्रग्स बॅनर व पोस्टर लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम तसेच त्याचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनांमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक प्रश्न याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

यानंतर कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक तसेच पालकांनी एकमुखाने “Say No To Drugs” ही शपथ घेत व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संकल्प केला.
पोलीस विभागाच्या अशा जनजागृतीपर उपक्रमांमुळे युवकांमध्ये सकारात्मक विचारसरणी निर्माण होत असून, समाजात आरोग्यदायी व व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी हे उपक्रम निश्चितच मोलाचे ठरणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button