AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठाच्या हिवाळी-2025 लेखी परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीरविद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती (दि.19.12.2025)-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी – 2025 लेखी परीक्षेची वेळापत्रके विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. सदर वेळापत्रकातील एम.ई. (डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स) सेमि.-3 (सी.बी.सी.एस.), बी.एस्सी. (अॅनिमेशन) सेमि.-3 (एन.ई.पी.), बी.ए. सेमि.-3 (एन.ई.पी.), बी.फार्म. सेमि.-1 आणि एम.फार्म सेमि.-1 या परीक्षांच्या वेळापत्रकात दुरुस्ती/सुधारित/नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येत असून विद्याथ्र्यांनी याची नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कळविण्यात येत आहे.
               यासंदर्भात सर्व प्राचार्य, केंद्राधिकारी, संबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्र यांना पत्राव्दारे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून, संबंधितांनी याची सर्व विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button