Latest NewsLaturSports

३५ वी राज्यस्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा, लातूर २०२५

लातूर जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रातील एक भव्य आणि रोमांचक स्पर्धेची रंगत चढू लागली आहे. क्रीडाप्रेमी लातूरकरांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. येत्या काही दिवसांत त्यांना राज्यातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवणाऱ्या तायक्वांदोपटूंचा थरारक सामना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे.

३५ वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरुष अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा २०२५ दिनांक ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत, औसा रोडवरील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून कौशल्यवान तायक्वांदोपटू सहभागी होणार असून, विशेषतः अनेक आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडूही मैदानात उतरतील. ऑलिम्पिक स्तरावरील शिस्त, तडफदार फाईट्स आणि वेगवान कौशल्य यांचा संगम लातूरकरांना ६ आणि ७ डिसेंबर रोजी अनुभवायला मिळणार आहे.

शासन मान्यताप्राप्त तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या मान्यतेने ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला माजी मंत्री आणि आमदार अमित विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मागील वर्षी ३४ वी राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर, पुन्हा एकदा लातूर जिल्ह्याला या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवास आणि भोजनाची संपूर्ण जबाबदारी जिल्हा संघटनेने स्वीकारली आहे.

तायक्वांदोमधील शिस्त, साहस आणि कौशल्याचा थरार अनुभवण्यासाठी ५ ते ७ डिसेंबर हा काळ लातूरकरांसाठी खास ठरणार आहे. क्रीडाप्रेमींनी ही संधी चुकवू नये!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button