ऑस्ट्रेलियात 16 वर्षांखालील मुलांचे Instagram–Facebook बंद! 4 डिसेंबरपासून META ची मोठी कारवाई

ऑस्ट्रेलियात सोशल मीडिया वापरावर मोठा बदल होत असून 4 डिसेंबर 2025 पासून 16 वर्षांखालील मुलांची Instagram, Facebook आणि Threads अकाउंट्स बंद केली जाणार आहेत. सोशल मीडिया कंपनी META ने अधिकृत घोषणा करत सांगितले की, हा निर्णय मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेसाठी घेतला जात आहे.
हा निर्णय ऑस्ट्रेलियन सरकारच्या 10 डिसेंबरपासून लागू होणाऱ्या कठोर कायद्याआधी घेण्यात आला आहे. या कायद्यानुसार 16 वर्षांखालील मुलांना कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
META ने जाहीर केले की:
- 13 ते 15 वर्षांच्या मुलांना “अकाउंट लवकरच बंद होणार” अशा नोटिफिकेशन्स पाठविण्यात येत आहेत.
- 4 डिसेंबरपासून 16 वर्षांखालील मुलांना नवीन अकाउंट उघडता येणार नाही.
- जुन्या अकाउंट्सचा प्रवेशही टप्प्याटप्प्याने बंद केला जाणार आहे.
- 10 डिसेंबरपर्यंत सर्व अकाउंट्स कायमचे डिलीट केली जातील.
सरकारच्या आकडेवारीनुसार, सध्या ऑस्ट्रेलियात:
- 3.5 लाख Instagram अकाउंट्स
- 1.5 लाख Facebook अकाउंट्स
हे 13 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांचे आहेत.
भारतामध्ये असा निर्णय कधी होणार?
ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयानंतर भारतातही अशा कायद्याची गरज आहे का?
सायबर सुरक्षा आणि बाल मानसशास्त्र तज्ज्ञांनी आता केंद्र सरकारला सोशल मीडिया नियमनाबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.
किशोरवयीन मुलांमध्ये सोशल मीडिया व्यसन, मानसिक ताण, आणि ऑनलाइन धोके वाढत असल्याने अशा पावलाची गरज भारतातही भासू शकते, अशी चर्चा तज्ज्ञांमध्ये सुरू झाली आहे.



