India NewsLatest NewsMaharashtra

नितेश मेश्राम मृत्यू प्रकरण: पोलिसांवर आरोप आणि न्याय मिळवण्यासाठी संघर्ष”

नितेश मेश्राम यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची सखोल चौकशी अखेर सुरू झाली आहे. २०१४ मध्ये घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा तपास केला होता. सध्या या प्रकरणाशी संबंधित आठ अमलदार आणि चार अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी सुरू असून, जिल्हा सत्र न्यायालयाने संबंधित पोलिस व प्रशासनिक अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग तसेच जिल्हा सत्र न्यायालय यांच्या हस्तक्षेपाबद्दल मृत नितेश मेश्राम यांच्या आई, परिवारातील सदस्य आणि समाजातील बांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींवर अतिप्रसंग (अॅट्रॉसिटी) कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भातील माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button