India NewsLatest NewsMaharashtra

ऑपरेशन थंडर मानकापूरात पोलिसांची मोठी धडक 52 ग्रॅम MD ड्रग्ज जप्त 3 अटक 1 फरार

 नागपूर शहरात अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत ‘ऑपरेशन थंडर’ सुरू असून, याच मोहिमेचा भाग म्हणून मानकापूर पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे.
मंगळवार, दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे दोन ते चारच्या दरम्यान राज अपार्टमेंट समोर, इलेक्शन हॉस्पिटलच्या मागे, न्यू मानकापूर परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली.

झडतीदरम्यान पोलिसांनी नबाब तोही जमशेद खान (31), आयुष अमृत मेश्राम (21), आणि रोहित रवींद्र सिंग (26). तीन आरोपींना ताब्यात घेतले —

तर, शहाणा वाजे उर्फ पक्या मोहम्मद आरिफ हा आरोपी अद्याप फरार आहे.

पोलिसांनी आरोपींकडून 52 ग्रॅम एम.डी. पावडर जप्त केली असून, त्याची बाजार किंमत रु. 2,60,000 इतकी आहे.
त्याचबरोबर 3 मोबाईल फोन, महिंद्रा स्कॉर्पिओ कार, आणि एक एक्टिवा मोपेड मिळून एकूण रु. 16,25,000 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी मानकापूर पोलिस ठाण्यात NDPS कलम 8(क), 22(क), आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button