Latest NewsNanded

गोदावरी गंगापूजनाची लंडन वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

गोदावरी किनाऱ्यावरील नांदेड हे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेने समृद्ध शहर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी आयोजित होणारे गोदावरी गंगापूजन हे नांदेडकरांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. गेल्या २४ वर्षांपासून सातत्याने पार पडणाऱ्या या कार्यक्रमाने यंदा एक नवा इतिहास घडवला आहे. या उपक्रमाची नोंद लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये झाली असून, नांदेडकरांसाठी ही एक अभिमानाची बाब ठरली आहे. बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता नगीना घाट येथे या रौप्यमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अॅड. श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला माजी मंत्री डी. पी. सावंत, भाजपा माजी महानगर प्रमुख प्रविण साले यांची विशेष उपस्थिती होती.
या विक्रमाबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स संस्थेचे भारताचे चेअरमन डॉ. अविनाश सकुंडे आणि उपाध्यक्ष डॉ. उत्तम मांढरे यांनी नांदेडवासियांचा गौरव केला आहे. हरिद्वार आणि वाराणसीनंतर नांदेडची गंगा आरती तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा सन्मानही या निमित्ताने प्राप्त झाला आहे.
या यशामागे लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल आणि धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
श्रद्धा, संस्कृती आणि समाजभावनेचा संगम असलेला हा सोहळा नांदेडच्या अभिमानाचा क्षण ठरला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button