Latest NewsMaharashtra

अक्रूर देवस्थानला खोट्या कागदपत्रांवर ‘ब वर्ग’ दर्जा — चौकशीची मागणी

बीड, ता. उमरद जहागीर (प्रतिनिधी)
उमरद जहागीर येथील अक्रूर देवस्थान या मंदिराला खोट्या कागदपत्रांच्या आधारे ‘ब वर्ग देवस्थान’ दर्जा देण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणात ग्रामपंचायतीचा ठराव आणि सुमारे ५० गावकऱ्यांच्या सह्या यांच्या आधारावरच दर्जा दिल्याचा आरोप होत आहे.

या संदर्भात राहुल भांबे यांनी जिल्हाधिकारी लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, “जर फक्त ग्रामपंचायतीचा ठराव आणि ५० लोकांच्या सह्यांवर ‘ब वर्ग’ दर्जा मिळत असेल, तर बीड जिल्ह्यातील सर्व गावातील देवस्थानांना देखील तसाच दर्जा द्यावा.”

या तक्रारीसोबत पोलिस ठाणे बीड ग्रामीण यांचे माहितीचा अधिकार कायद्यान्वये (पत्र क्र. ३०२१, दि. २९ ऑगस्ट २०२५) दिलेले उत्तर जोडले गेले आहे. त्या पत्रानुसार,

“अक्रूर देवस्थान, उमरद जहागीर यासंदर्भातील कोणतीही माहिती पोलीस ठाण्याकडे उपलब्ध नाही.”

यावरून संबंधित देवस्थानाच्या नोंदींबाबत शंका निर्माण झाली आहे.
राहुल भांबे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, “अक्रूर देवस्थानला ब वर्ग दर्जा देताना शासन नियमांची पूर्तता न करता केवळ काही व्यक्तींच्या सह्यांच्या आधारे निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शासनाची फसवणूक झाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.”

पत्रात हेही नमूद करण्यात आले आहे की, पोलिस ठाणे कोणत्याही नोंदी उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर आले आहे. त्यामुळे हा दर्जा खोट्या दस्तऐवजांच्या आधारे मिळविण्यात आला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या तक्रारीसोबत बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे माहिती अधिकार पत्र तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेले तक्रारपत्र (फोटोमध्ये दर्शविलेले) जोडण्यात आले आहे.

राहुल भांबे यांचे असे म्हणणे आहे आहे की, अक्रूर देवस्थान प्रकरणाची चौकशी निष्पक्ष अधिकाऱ्याकडून करून खरी माहिती जनतेसमोर आणावी आणि खोट्या कागदपत्रांचा वापर झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button