Latest NewsMaharashtraNagpur

वीनो भावे नगरमध्ये २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला

नागपूरच्या यशोधरा नगर परिसरात एक भीषण प्रकार समोर आला. वीनो भावे नगरमधील भट्टा सिग्नलजवळ एका अज्ञात तरुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला दिसल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली. तात्काळ याबाबतची माहिती यशोधरा नगर पोलीस ठाण्याला देण्यात आली.
पोलीस निरीक्षक रमेश खुने सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दल आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून मृतदेहाजवळून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. प्राथमिक तपासानुसार, मृत तरुणाचं नाव शुभम मंगळदास निमजे असून वय अंदाजे २० ते २५ वर्षे आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून नेमकं मृत्यूचं कारण काय हे पोस्टमॉर्टेम अहवालानंतरच स्पष्ट होईल. पोलिसांनी परिसरातील CCTV फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून मृतक कोणत्या भागातील आहे याचा शोध पोलीस घेत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button