Accident NewsLatest NewsMaharashtra

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

कारंजा – कारंजा लाड तालुक्यातील शाहा गावातील रहिवासी सचिन काटोले वय अंदाजे ४५ ते ४८ वर्षे यांचा समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू झाला. ही घटना कारंजा लाड येथून नागपूरकडे जाणाऱ्या टर्निंगवर घडली. अपघात पहाटेच्या सुमारास घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळीच सचिन काटोले यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार अज्ञात मोठ्या वाहनाने, बहुधा ट्रकने, त्यांना जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे. मात्र अचूक कारण व वाहनाचा तपशील अद्याप स्पष्ट नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असल्याने स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button