Accident NewsLatest News

धावत्या ट्रेनमधून पडला प्रवासी, पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने वाचला जीव..

धामणगाव: धामणगाव रेल्वे स्थानकावर कोल्हापूर ते गोंदिया जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसमधून 60 वर्षीय प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये चढताना तोल जाऊन खाली पडला. या अपघाताततो गंभीर जखमी झाला होता, मात्र दत्तापूर पोलीस, रेल्वे पोलीस आणि एका स्थानिक तरुणाच्या मदतीने त्याचा जीव वाचला.

ही घटना स्टेशनवर उपस्थित असलेल्या दत्तापूर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मनोज धोटे, रेल्वे पोलीस कर्मचारी उमेश धुराटे आणि पंकज खसाळे यांनी पाहिली. त्यांनी लगेच धावपळ करून जखमी व्यक्तीला स्ट्रेचरवर घेतले आणि तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

याचवेळी, स्थानिक तरुण गौरव चिकणे यांनी प्रसंगावधान राखत त्वरित गाडीची चेन ओढून ती थांबवली, ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर जखमीला पुढील उपचारांसाठी सेवाग्राम येथे हलवले आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रवाशांच्या निष्काळजीपणाचा धोका समोर आला आहे. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार धावत्या गाडीत चढू नये अशा सूचना दिल्या जातात, तरीही प्रवासी अशा चुका करतात. मात्र, धामणगाव पोलीस आणि नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आज एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. त्यांच्या या कामाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button