महाभंयकर! ड्रग्जच्या पैशांसाठी अनेक पुरुषांसोबत शरीरसंबंध.. तरुणीमुळे 19 जणं एचआयव्ही पॉझिटीव्ह

एक महाभंयकर प्रकरण समोर आले आहे. 17 वर्षांची मुलगी पैशांसाठी वेगवेगळ्या पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवायची. पण या तरुणीमुळे 19 पुरुषांना एचआयव्हीची लागण झाली आहे. या मुलीला ड्रग्जचे व्यसन होते. नेमकं काय घडलं जाणून घेऊया…
उत्तराखंड रामनगर :-शरीरसंबंधांवरुन अनेक ठिकाणी हत्या झाल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. मात्र, आता एक महाभयंकर प्रकरण समोर आले आहे. एका 17 वर्षीय तरुणीला ड्रग्जचे व्यसन लागले होते. पण ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे तिने पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सुरुवात केली. पण गेल्या दीड वर्षांमध्ये या तरुणीमुळे जवळपास 19 पुरुषांना एचआयव्हीची लागण झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. एका तरुणाने थेट सोशल मीडियाचा वापर करत याबाबत माहिती दिली आहे. आता हे प्रकरण कुठे घडले? चला जाणून घेऊया..
उत्तराखंडच्या रामनगर शहरातील हे धक्कादायक प्रकरण आहे. हे प्रकरण गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नैनीताल जिल्ह्यातील गुलरघट्टी परिसरात प्रथम समोर आले. एक 17 वर्षीय मुलगी, जी कथितपणे ड्रग्सच्या व्यसनाधीन होती, तिने गेल्या दीड वर्षात किमान 19 पुरुषांना ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) पसरवला आहे. अहवालानुसार, ही किशोरी अनेक स्थानिक पुरुषांच्या संपर्कात होती आणि त्यापैकी अनेकांना नंतर एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले. ती मुलगी तिला मिळालेल्या पैशांचा उपयोग तिच्या ड्रग्सच्या व्यसनासाठी करत होती.



