ChandrapurLatest NewsMaharashtra

प्रवाशांनी खचाखच भसलेली एसटी बस उलटली, दोघांचा जागीच मृत्यू; चंद्रपूरमध्ये खळबळ

चंद्रपूरमध्ये एसटी बसला भीषण अपघात झाला. एसटी बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

संजय तुमराम, चंद्रपूर
चंद्रपूरमध्ये एसटी बसला भीषण अपघात झाला. भरधाव एसटी बस महामार्गावर उलटली. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना चिमूर-वरोरा महामार्गावर घडली. अपघातानंतर चंद्रपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरमध्ये भरधाव एसटी बस रस्त्याच्या कडेला उलटून मोठा अपघात झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर- वरोरा मार्गावरील चारगावजवळ ही घटना घडली. ही एसटी बस चिमूरवरून चंद्रपूरकडे जात होती. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही एसटी बस रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटली. त्यामुळे एकच गोंधळ उडाली. अपघातानंतर बसमधील प्रवासी मदतीसाठी ओरडत होते.

हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये बसमधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ८ जण गंभीर जखमी झालेत. अपघातामध्ये १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये बसच्या वाहकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या बसमधून ३५ जण प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने तात्काळ जखमी प्रवाशांना उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघाताचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button