JalgaonLatest NewsMaharashtra
पोंगे व कुरकुरे बनविण्याच्या कंपनीला अचानक लागली आग

धुळे शहरात सिंधी कॅम्प येथील सदाशिव फूड्स या पोंगे व कुरकुरे बनवण्याच्या कंपनीला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे, यासंदर्भातील माहिती अग्निशमन विभागास दिल्यानंतर अग्निशमन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, व मोठ्या शर्तीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले आहे.



