Latest NewsMaharashtra

व्हायरल हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या आणि नागपुरातील खवय्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे नॉन-व्हेज हॉटेल दररोज अनेक ग्राहकांना आकर्षित करते.

काही दिवसांपूर्वीच हॉटेल मालकाने नवीन फॉर्च्युनर गाडी खरेदी केली होती, ज्याची शहरात जोरदार चर्चा झाली होती. याच चर्चेत असलेल्या हॉटेलच्या मालकाला आता मारहाण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी संबंधित तरुणांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नागेश मडके यांनी दिली आहे. मारहाणीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या घटनेमुळे हॉटेल भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.


profile picture

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button