AmravatiLatest News

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर रविवारी आकाशवाणीवर

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत सत्र 2025-26 करिता विद्यार्थी हितार्थ विविध योजनांची सुरुवात ऑगस्ट महिन्यापासून होणार आहे. यासंदर्भातच विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर रविवार दि. 13 जुलै, 2025 रोजी सकाळी 10.00 वा. अमरावती आकाशवाणीच्या युवावाणी या लोकप्रिय कार्यक्रमातून डॉ. बोरकर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणीचे नैमित्तिक उद्घोषक श्री नितीन भट हे डॉ. राजीव बोरकर यांच्याशी यावेळी संवाद साधतील.

 संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने विद्यार्थी हितार्थ चालविल्या जाणा-या कमवा आणि शिका, शुध्द पेयजल योजना, विद्याधन योजना, विद्यार्थी दायित्व निधी योजना, शिक्षण संरक्षण योजना, बस पास सवलत योजना, विद्यार्थी विकास निधी शिष्यवृत्ती, कौशल्य विकास योजना, सायकल योजना, विद्यार्थी सुरक्षा विमा आणि विद्यापीठाच्यावतीने विद्याथ्र्यांना विधायक कार्यासाठी दिले जाणारे विविध पुरस्कार, विद्याथ्र्यांना काही तक्रारी असल्यास विद्यापीठातील तक्रार निवारण केंद्राच्या कार्यपध्दतीविषयी व युवा महोत्सव अशा विविध विषयांवर या मुलाखतीतून डॉ. राजीव बोरकर हे प्रकाश टाकणार आहेत.

विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच सर्वांनी या मुलाखतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख श्री भैय्यालाल टेकाम, वरिष्ठ उद्घोषक श्री संजय ठाकरे, कार्यक्रम अधिकारी श्री विनोद गवळी यांनी केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button