संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पदवीदान समारंभ २५ जूनला – प्रमुख मार्गदर्शक डॉ. दीपक धोटे

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने दिनांक २५ जून २०२५ रोजी सकाळी 11 वाजता पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ विद्यापीठ परिसरातील दृकश्राव्य सभागृह, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचे प्राचार्य तथा विद्यापीठ विद्या परिषद सदस्य, डॉ. दीपक धोटे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आजीवन अध्ययन व विस्तार मंडळ सदस्य डॉ. रवींद्र सरोदे, विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. सुभाष गावंडे आणि विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदूरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक तथा प्राध्यापक डॉ. श्रीकांत पाटील हे आहेत. या समारंभात सर्व पदवीधरांनी उपस्थित रहावे असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



