AkolaLatest News

डाबकी रस्ते विस्ताराचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ आमदार पठान यांनी लगावली ठेकेदारांना फटकार

अकोला – अकोला शहरातील जुन्या डाबकी रोड परिसरात सध्या सुरू असलेल्या रस्त्याचे चौकटीकरण आणि नाली बांधकामाच्या कामावर नागरिकांमध्ये वाढत असलेला असंतोष लक्षात घेता, बुधवारी सकाळी आमदार साजिद खान पठान यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.

काम अधूरं, रस्ते खड्डेमय, पावसाच्या पाण्याची नासधूस!
या भागातील नागरिकांनी कामाच्या गुणवत्तेबाबत आणि पावसाच्या तुंबलेल्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत तक्रारी केल्या होत्या. रस्त्याची अत्यंत खराब अवस्था, नाल्यांचे अपूर्ण बांधकाम आणि साफसफाईअभावी नाल्यांमधून पाणी रस्त्यावर साचणे – यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

फक्त डाबकी रोड नव्हे – उड्डाणपुल आणि अंडरपासच्या कामावरही आमदार पठान यांचे ताशेरे
कामाच्या पाहणी दरम्यान आमदार पठान यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शहरात पावसाशिवाय पाणी साचते, म्हणजेच ही गुणवत्ता नाही तर खेळ आहे.” उड्डाणपुल आणि अंडरपास अशा महत्वाच्या ठिकाणी पावसाचाही संबंध नसताना पाणी साचत असल्याचा उल्लेख करत तेथील गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ठेकेदारांना स्पष्ट इशारा – दर्जा घ्या नाहीतर कारवाई ठरलेली!
या पाहणीवेळी आमदार पठान यांनी मनपा अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांना ठणकावून सांगितले की, “काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झालं पाहिजे. नागरिकांच्या पैशातून काम चालतंय, खेळ मांडण्याची परवानगी नाही!” त्यांनी अधोरेखित केलं की, जर हलगर्जीपणा दिसून आला, तर संबंधितांवर कारवाई होणारच.

कोण होते उपस्थित?
यावेळी मनपा कार्यकारी अभियंता अजय गुजर, शैलेश चोपडे, ठेकेदार संजय अग्रवाल, जावेद जकारिया, काँग्रेस युवा नेता आकाश कवडे, शिवसेना शिंदे गटाचे संतोष अनासाने, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button