AmravatiamravatinewsLatest News

बारावीत अमरावती विभागाचा 91.43% निकाल, मुलींनी सर्व शाखांमध्ये बाजी मारली!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने सोमवारी ५ मे रोजी इयत्ता बारावी (HSC) चा निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षी अमरावती विभागाने 91.43% निकालाची नोंद केली असून राज्यभरात तिसरा क्रमांक पटकावला आहे.

जिल्हानिहाय टक्केवारी:
जिल्हा टक्केवारी (%)
वाशिम 95.66%
बुलढाणा 95.18%
अमरावती 91.05%
यवतमाळ 90.63%
अकोला 84.28%
एकूण 91.43%

विद्यार्थी संख्येचा आढावा
एकूण महाविद्यालये: 1,767
नोंदणी केलेले विद्यार्थी: 1,53,026
परीक्षेला बसलेले विद्यार्थी: 1,45,237
उत्तीर्ण विद्यार्थी: 1,32,814
परीक्षा केंद्रे: 542

मुली पुन्हा आघाडीवर – सर्व शाखांमध्ये बाजी!

शाखेनिहाय मुलं-मुलींची यशाची टक्केवारी:

शाखा मुली (%) मुले (%)
विज्ञान 98.42 97.05
कला 88.10 78.21
वाणिज्य 95.47 88.92

या निकालातून स्पष्टपणे दिसून येते की यावर्षीही मुलींनी सर्वच शाखांमध्ये मुलांपेक्षा जास्त यश संपादन केले आहे. ही माहिती विभागीय सचिव नीलिमा रमेशराव टाके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यपातळीवर अमरावतीचा तिसरा क्रमांक
निकालाच्या तुलनेत अमरावती विभागाने यंदा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे. सातत्यपूर्ण यशामुळे विभागीय शिक्षण क्षेत्रात अमरावतीची पताका पुन्हा एकदा उंचावली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button