नविन बांधकाम साईटवर चोरी; बेलतरोडी पोलिसांनी केला गुन्हा उघड एक आरोपी अटकेत

नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भक्ती पार्क, वेळाहरी येथील प्लॉट क्र. १२ वर सुरु असलेल्या नवीन बांधकाम साईटवरून तब्बल १ लाख १० हजार रुपये किमतीचे इतर साहित्य आणि इलेक्ट्रिक वायर चोरीला गेल्याची घटना २९ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून ३० एप्रिलच्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान घडली.
या प्रकरणी फिर्यादीने ३ मे २०२५ रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीसांनी तत्काळ कारवाई करत अप.क्र. २९३/२०२५, कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचा तपास डीबी पथकाकडे सोपवण्यात आला होता, आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ओम रामदास गावंडे (वय २३), रा. प्लॉट नं. ४७, व्यंकटेश शेट्टी मागे, घरकुल सोसायटी, बेसा, पो.ठ. हुडकेश्वर, नागपूर यास अटक केली आहे.
तपासादरम्यान गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल आणि आरोपीने वापरलेली एक्टिवा दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदर गुन्हा उघडकीस आणण्यात बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या डीबी पार्टीचे मोलाचे योगदान असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.



