AmravatiLatest News

संत गाडगे बाबांच्या दुर्मिळ चित्रप्रदर्शनीला अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री कृष्ण प्रकाश यांची भेट

अमरावती : महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री कृष्ण प्रकाश यांनी विद्यापीठातील संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राला नुकतीच भेट देवून संत गाडगे बाबांच्या दुर्मिळ छायाचित्राच्या प्रदर्शनीची पाहणी केली. भेटीप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश तथा गोवा राज्याचे लोकायुक्त श्री ए.एच. जोशी, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सेवानिवृत्त न्यायाधीश श्री एस.जी. मेहरे, अॅड. ज्योती प्रवीण खानपासोळे, अॅड. प्रवीण खानपासोळे, अमरावती जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष अॅड. किरण मिश्रा, सदसरू प्रा. सारिका तेलखडे, माजी अध्यक्ष वंदना चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी अध्यासन केंद्र प्रमुख डॉ. दिलीप काळे यांनी मान्यवरांना संत गाडगे बाबांच्या जीवन व कार्याविषयी माहिती दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button