AmravatiLatest News
अमेठी विद्यापीठात होणा-या राष्ट्रीय महोत्सवाकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या चार विद्याथ्र्यांची निवड

4 ते 08 जानेवारी, 2025 दरम्यान गणपत विद्यापीठ मेहसाना, गुजरात येथे पार पडलेल्या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे विद्यार्थी चेतन खापरे याने शास्त्रीय तालवाद्य, पाश्चिमात्य वाद्य संगीत स्पर्धेत प्रथमेश अडालगे, फाईन आर्ट (पोस्टर मेकिंग) स्पर्धेत कु. प्रगती सुधा, सुगम संगीत स्पर्धेत मोहंमद अबसार मोहंमद साबीर या चार विद्याथ्र्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करुन चार पारितोषिके पटकाविलीत. या चारही विद्याथ्र्यांची अमेठी विद्यापीठ, उत्तरप्रदेश (नोएडा), नवी दिल्ली येथे 03 ते 07 मार्च, 2025 दरम्यान होणा-या राष्ट्रीय युवा महोत्सव स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. सदर विद्यार्थी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या अभूतपूर्व यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी विद्याथ्र्यांचा सत्कार करुन त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत विद्याथ्र्यांकरिता मोठ¬ा प्रमाणात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते व त्यामधून अनेक प्राविण्यप्राप्त विद्यार्थी घडतात आणि विद्यापीठाचा नावलौकीक करतात. त्यामुळे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे, असे प्रशंसोद्गार याप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी व्यक्त केले. या यशाबद्दल प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, रा.से.यो. संचालक डॉ. निलेश कडू यांनी विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले आहे. चमू व्यवस्थापक म्हणून डॉ. सावन देशमुख व प्रा. नेत्रा मानकर यांनी यशस्वीरित्या भूमिका पार पाडली. विद्याथ्र्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



