जोश आणि जुनूनने झाली जैन संस्कार प्रीमियर लीगची उत्साहपूर्ण सुरुवात!

“जोश आणि जुनूनने भरलेली जैन संस्कार प्रीमियर लीग”! समाजातील खेळसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ताजेतवानेपणाचा अनुभव देण्यासाठी जैन संस्कार युवा मंचतर्फे या अनोख्या क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. चला, पाहूया या शानदार सोहळ्याचा संपूर्ण आढावा!
अमरावतीमध्ये जैन संस्कार युवा मंचतर्फे प्रथमच भव्य जैन संस्कार प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत समाजातील विविध वयोगटांतील खेळाडूंचा सहभाग असून, तब्बल आठ संघ उत्साहात क्रिकेटच्या या अनोख्या फॉरमॅटमध्ये खेळणार आहेत.
आजच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचे जल्लोषात उद्घाटन झाले. उपस्थित मान्यवरांमध्ये अजय पाइप्सचे संचालक श्री कमलजी नाहटा, अभिनंदन बँकेचे अध्यक्ष श्री विजयजी बोथरा, सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतीया, पर्व सेल्सचे संचालक श्री जितेंद्रजी गोलछा आणि संस्कार ग्रुपच्या श्री निमिषा कोटेचा यांचा समावेश होता.
या वेळी मंचाचे अध्यक्ष महेंद्र भंसाली यांनी स्पर्धेचे उद्दीष्ट स्पष्ट करताना सांगितले की, बदलत्या जीवनशैलीत आरोग्य व खेळभावना टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. पारंपरिक क्रिकेटपासून बॉक्स क्रिकेटच्या या स्वरूपाकडे आकर्षण वाढत असल्याने समाजबांधवांसाठी हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
कार्यक्रमाचे संचालन सचिव निखिल समदरिया यांनी केले. तर, यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प प्रमुख राहुल भंडारी, हरिश गांधी, रमेश मुनोत, अभिषेक नाहटा आणि त्यांच्या टीमने अथक मेहनत घेतली.सर्वांचे आभार प्रदर्शन आशीष जैन यांनी केले. कार्यक्रमात मंचाचे माजी अध्यक्ष श्री. राजेशजी चोरडिया, भीकमचंद सिंघवी, हरीश खिवसरा, अजय लुंकड, अशोक सिंघवी, रतन भंसाली, मनीष सिंघवी, दीपराज तातेड़, अर्पित सिंघवी, नितेश पटवा, जय लुनिया, डॉ. नितिन बर्डिया, रितेश शाह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर, जैन संस्कार प्रीमियर लीगने उत्साहाचा नवा अध्याय लिहिला आहे. खेळाडूंच्या सहभागाने आणि प्रेक्षकांच्या प्रोत्साहनाने हा उपक्रम अधिकाधिक यशस्वी होईल. पुढील सामने आणि विजेत्यांबद्दल अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.



